शुभम नागदेव //शहर प्रतिनिधी
आमदार दादाराव केचे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होत काँग्रेसचे कार्यकर्ते निखिल होले यांनी रीतसर प्रवेश केला. आर्वी विधानसभा क्षेत्रात आमदार दादाराव केचे यांनी केलेली विकासात्मक कामे न भुतो अशीच असुन आजवर काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ होऊन काम करूनही स्थानिक नेतृत्वाने सत्ता असुनही आर्वी करता निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुद्धा केले नाही त्या उलट भारतीय जनता पक्षाचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतांना दादाराव केचे यांनी भरभरून निधी विकास कामांसाठी खेचून आणला. आणि आता आमदार असतांना दादाराव केचे यांची विकासात्मक कामे अविरत सुरूच आहे. या कार्यशैलीवर प्रभावित होत सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी प्रवेश केला आहे असे निखिल होले यांनी सांगितले. आमदार दादाराव केचे यांनी त्यांची नियुक्ती युवा मोर्चा सरचिटणीस आर्वी शहर भाजपा या पदी केली.
यावेळी जगन गाठे अध्यक्ष भाजपा आर्वी शहर, मयुर पोकळे अध्यक्ष भाजयुमो आर्वी शहर यांच्यासह युवा मोर्चा भाजपाचे कार्यकर्ते अभिजित कुऱ्हाडे, तुषार लंगडे, तेजस जहकर, रोहीत भाकरे, ओम लोखंडे, करण घोडे, सुरेंद्र होले, यश देवघरे, प्रतिक आसोले, अर्जुन घोडे, मंथन नांदेकर, अमर लंगडे, चेतन ईठ्ठोले, अनिकेत मुरतकर, तेजस बोराडे, यश मोरे, कुमार पारीसे, क्रिष्णा लंगडे यांची व इतरांची उपस्थिती होती.