शहराच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर. आमदार समिर कुणावार 

 

हिंगणघाट दि.27 ऑक्टोबर
शहरातील प्रभाग क्रमांक 18 (ब) शास्त्री वार्ड येथील नागरीकांच्या समस्या तसेच प्रलंबीत प्रश्न सोड़वण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांसह मी नेहमीच तत्पर आहे असे आश्वासन आमदार समीर कुणावार यांनी देत मतदारसंघातील सामान्य जनतेला भेड़सावत असलेल्या अनेक समस्या लवकरात लवकर सोड़ाविण्यात येतिल अशी घोषणासुद्धा त्यांनी शास्त्री वार्ड येथील भारतीय जनता युवा मोर्चा,भारतीय जनता पक्ष तसेच भारतीय जनता महिला मोर्चाचेवतीने संयुक्तरित्या आयोजित शाखा उदघाटन कार्यक्रमाच्यावेळी काल 26 रोजी केले.
उपरोक्त कार्यक्रमाचेवेळी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी आमदार कुणावार यांचे प्रयत्नाने पूर्ण झालेल्या शहरातील झालेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर, हिंगणघाट न.प.चे माजी सभापती सोनु गवळी, अल्पसंख्यक अध्यक्ष बिस्मिल्लाह खान, महामंत्री अनिल गहेरवार, पूर्व कार्यकर्ता बबनराव साटोने, युवा उद्योजक अज्जु करवा, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष सोनू पांडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता, नगरसेविका सौ संगिता साठे, सौ छाया सातपुते, सौ रविला आखाड़े ईत्यादि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आशीष पर्बत यांनी केले.
युवा नेते यशवंत कामडी तसेच स्थानीय कार्यकर्ता मारोतराव साठे, सुयोग चांगले, सुशील देशमुख, धनंजय उमप, संजय कासे, राहुल भूते, दिनेश गोहने, नीलेश पांडे, गजानन वाट, अविनाश ठाकरे, सुरेश टेलर, सौ नीता गेडेकार, सौ सुलोचना किन्नाके, सौ प्रेमा तिवारी, सौ चिंचुलवार काकु या सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.