क्रेडिट कार्डची माहिती विचारुन फसवणूक करणाऱ्या आरोपींना दिल्ली येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

पो.स्टे. हिंगणघाट अपराध क्र. ७९१/२०२१ कलम ६६ (डी) IT Act
घटना तारीख वेळ :- दिनांक ०६/०९/२१ चे १२.५३ वा दरम्यान
दाखल ता वेळ :- दि. ०७/०९/२०२१ चे २२.१५ वा.
फिर्यादी सौ. सुप्रिया झाडे रा. हिंगणघाट, ज़ि. वर्धा
आरोपी नाव :- आरोपी १) विवेक प्रसाद शहा, वय २१ वर्ष, रा. विकास नगर, दिल्ली,
२) आकाश गणेश मंडल, वय २१ वर्ष, रा. दिल्ली,
३) रॉबिन श्याम करोटीया, वय २१ वर्ष, रा. दिल्ली
जप्त माल :- ३ मोबाईल, दोन डेबिट कार्ड, बैंक पासबुक एकूण किंमत ९०००/- रुपये

सविस्तर याप्रमाणे आहे कि, फिर्यादी सौ सुप्रिया झाडे यांना एका अज्ञात इसमाने फोनद्वारे “मी बँकेतून बोलत आहे तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे सुरू ठेवायचे असल्यास कार्ड नंबर सांगा व ओटीपी सांगा” असे सांगुन फ़िर्यादीला विश्वासात घेवुन फिर्यादी यांचे क्रेडिट कार्डची माहीती घेवुन फिर्यादी यांचे बैंक खात्यातुन एकुण ९९,२७५/- रु. आर्थिक फसवणुक केली. फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दिलेल्या रिपोर्टवरून दिनांक ०७-०९-२०२१ रोजी पो.स्टे. हिंगणघाट अपराध क्र. ७९१/२०२१ कलम ६६ (डी) IT Act अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल, वर्धा मार्फत करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये तांत्रिक माहिती काढण्यात आली व मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून वरील गुन्ह्यातील आरोपी हे दिल्ली येथील निष्पन्न झाल्याने पथक तयार करून दिल्ली येथे रवाना होऊन दिल्ली येथील नवादा, उत्तम नगर, विकास नगर हा भाग ५ ते ६ दिवस पालथा घालुन वरील तिन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेवुन वर नमुद गुन्हा उघड़किस आणला.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट श्री दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संपत चौव्हाण, पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड, सपोनि महेंद्र इंगळे, सायबर शाखा, पोउपनि. सोमनाथ टापरे, पो.स्टे. हिंगणघाट, पोलीस अंमलदार निलेश कट्टोजवार, अनूप कावळे, स्मिता महाजन, सायबर शाखा, निलेश तेलरांधे, आकाश कांबळे, पो.स्टे. हिंगणघाट व सायबर पथक यांनी केली.