श्री गुरुदेव सेवा मंडळ सुसुंद्रा यांचे कळून गुरुमाऊलीस श्रद्धांजली अर्पण

 

धिरज कसारे// कारंजा तालुका प्रतिनिधी

 

मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना आज श्री गुरुदेव सेवा मंडळ सुसुंद्रा यांनी आपल्या गावातच मौन श्रद्धांजली अर्पण केली सर्वप्रथम परिसर स्वच्छ करण्यात आला त्यानंतर छोट्या बाल गोपालांनी सामूहिक ग्रामगीता वाचन केले, त्यानंतर श्री गुरुदेव सेवा मंडळातील सेविका चेतना ढोक ईने वंदनीय महाराज यांचे जीवन चरित्र मांडले तिला साथ देत वेदिका लहाबर, प्रणाली लहाबर, उज्वला फुले, प्रीती पाटमासे, वेदिका घोडे, व उज्वल काळे या लहान चिमुकल्यांनी भजन सेवेची साथ दिली, नंतर सायंकाळी 4 .58 मी वंदनीय गुरुमाऊलींना पाणावलेल्या नेत्रांनी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . या कार्यक्रमाला श्री गुरुदेव सेवा मंडळाची सर्व सेवक मंडळी, गावातील युवक मंडळी, सर्व बंधू – भगिनी , बाल गोपाल उपस्थित होते, सर्वानी सिस्थित व गंभीर वातावरणात महाराजाना मौन श्रद्धांजली अर्पण केली लहान मुलांनी जणू गावातच गुरुकुंज दर्शन गावातील मंडळींना घडवले असे वाटत होते .