बँक निवडणूकीत काँग्रेसला संपविण्याचा डाव जिल्ह्याच्या नेतृत्वाने हाणून पाडला – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 

अमरावती, ता. २४ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला संपविण्याचा काहीजणांचा डाव होता. मात्र, जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाने समर्थपणे लढून हा डाव हाणून पाडला, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालकांचा सत्कार समारंभ महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

श्री. थोरात म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांचे राजकारण नव्हे, काँग्रेस पक्षालाच संपविण्याचा डाव होता. मात्र, या समर्थ नेतृत्वाने समर्थपणे लढा देऊन हा डाव हाणून पाडला.

काँग्रेस पक्ष हा शेतकरी, शेतमजूर, वंचित, गरीब, श्रमिक यांच्या प्रगतीसाठी झटणारा व तळागाळातील माणसांमध्ये रुजलेला पक्ष आहे. त्याची प्रचिती जिल्हा बँकेच्या निवडणूकीतील विजयाने आली. या निवडणुकीच्या माध्यमातून जनसामान्यांची पक्षाला असलेली साथ दिसून आली व जिल्हा नेतृत्वाने पक्षाचे अस्तित्व अधिक दृढ केले.

यावेळी बँकेचे नवनियुक्त संचालक
यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सहकार पॅनल मधील नवनियुक्त संचालकांचा सत्कार यांच्या हस्ते करण्यात आला,
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री यशोमती ठाकूर , जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख , माजी आमदार प्रा . वीरेंद्र जगताप , माजी मंत्री रणजीत कांबळे , आमदार बळवंत वानखडे , रामकिसन ओझा , शहराध्यक्ष बबलू शेखावत , विलास इंगोले , जिप सभापती दयाराम काळे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते .