“आप” पक्षातर्फे खड्डे दुरुस्ती व तयार सिमेंट रस्त्यांचा दर्जा उच्च प्रतीचा असावा संबंधीत विषयाला घेऊन निवेदन

मागील काही दिवसांपासून लोकांच्या असं निदर्शनात आलं आहे की नागपुर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अधिक डांबरी रस्त्यांची परिस्थिती
फारच वाईट झालेली आहे.

 

संपूर्ण शहरात महानगरपालिकेच्या अंतर्गत तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता ही खालच्या दर्जाची आहे, त्यामुळे वारंवार तयार करण्यात येणारे हे रस्ते लवकरच खराब होतात. आज नागपुरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. हे रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यामुळे झाल्यामुळे नागरिकांना वाहन चालवायला त्रास होतो.

अनेक गाड्या स्लीप होतात, वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. रस्ते खराब असल्यामुळे व त्यावर खड्डे असल्यामुळे लोकांना विभिन्न प्रकारचे मणक्याचे आजार देखील होतात. शहरात ट्राफिक ची समस्या

दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. खराब रस्त्यांमुळे शहरात सरासरी गाड्यांची स्पीड कमी होते, त्यामुळे ट्रॅफिक समस्येला वाव मिळतो. ह्या सगळ्या समस्या पाहता मनपा अंतर्गत येणाऱ्या डांबरी व नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकरिता उच्च दर्जाचे मानक तयार करायला पाहिजेत. पावसाळा संपल्यामुळे तसेच आता तातडीने शहरातील सर्व डांबरी रस्त्यांवरील खड्डे

सुधारण्याचे कार्य करण्यात यावे. अश्या आशयाशी संबंधित विनंतीपूर्वक निवेदन नागपूर महानगर पालिकेचे महापौर मा. श्री. दयाशंकर तिवारी ह्यांना देण्यात आले. येत्या आठवड्या भाऱ्यात खड्डे बुजविण्याचे आणि रस्त्याच्या कामात सुधारणा न झाल्यास आम आदमी पक्षातर्फे आंदोलन उभे करण्यात येईल.

निवेदन सादर करतेवेळी पक्षाचे उच्च पदस्थ पदाधिकारी देवेंद्र वानखड़े राज्य समिति सदस्य व विदर्भ संयोजक, जगजीत सिंघ – महा कोशाध्यक्ष, अशोक मिश्रा-राज्य सह सचिव, शालिनी अरोरा , गिरीश तितरमारे- युवा संयोजक (नागपुर शहर), रोशन डोंगरे-संयोजक उत्तर नागपुर, सुनील बरापात्रे, विनोद कोवे, अशोक घरदे, गौतम कवाडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.