शाहिद दिवसाचे औचित्य साधून कर्तव्य बजावताना शाहिद झालेल्या पोलीस बंधू भगिनींना श्रद्धांजली अर्पण

 

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस शहीद दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होत गेल्या वर्षभरात आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस बंधू भगिनींना श्रद्धांजली अर्पण केली.

गेल्या वर्षभरात कोरोना वैश्विक महामारीच्या संकटकाळात नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली तर काही जणांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले.

अशा राज्यभरातील एकूण ३७७ शहीद वीरांच्या स्मृतींना वंदन करित त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाला अभिवादन केले. यासमयी शहिद पोलीस बांधवांच्या कुटूंबियांची भेट घेऊन राज्य सरकार सदैव तुमच्या सोबत असल्याचे प्रतिपादन करित त्यांना दिलासा दिला.

याप्रसंगी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरेश मेखला
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व प्रमुख पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच जवान उपस्थित होते.