उपसेवाधिकारी रमेश धंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली सुसंद्रा येथे गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना

 

प्रतिनिधी // धीरज कसारे

आज दिनांक 19/10/2021 मंगळवार ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराजांचे विचार प्रत्येकापर्यंत तसेच घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशाने गाव तिथे गुरुदेव सेवा मंडळाची शाखा स्थापित करून त्या माध्यमातून ध्यान , प्रार्थना , ग्रामजयंती तसेच समाजकार्य या मधून महाराजांचे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचतील या माध्यमातून आज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कारंजा तालुका उपसेवाधिकारी

 

श्री रमेशरावजी धंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली सुसुंद्रा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली त्यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सुसुंद्रा सेवाधिकारी म्हणून श्री. निलेश हरिविजयजी फुले यांची नियुक्ती करण्यात आली

 

व उपग्रामसेवाधिकारी श्री. दिपक रामदासजी भोने , कोषाध्यक्ष श्री. मंगेश गजाननराव भोने , सचिव श्री. भुषण धनराजजी घोडे , प्रचार प्रमुख श्री. भुषण रमेशराव भोने , भजन प्रमुख श्री. अतुल अशोकराव वानखडे ,

 

महिला प्रमुख सौ.दिपाली संजयराव जेवढे , सभासद रंजना गोवर्धन फुले ,अक्षय राजूजी भोने , विजय नामदेवराव मासोदकर, अमोल देविदास घोडे, मोरेश्वर दामाजी फुले , मोहन नरेंद्र जेवडे यांची नियुक्ती करण्यात आली

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे नारा सर्कल केंद्रसेवाधिकारी कु. आशिष पं. किनकर , श्री . गुरुदेव सेवा मंडळाचे नारा ग्रामसेवाधिकारी कु. धिरज ला. कसारे , सचिव कु. विष्णू र. धंडाळे , भजन प्रमुख प्रविण पां . गजबे , सदस्य भुषण सु. मुन्ने उपस्थित होते