कुऱ्हाडीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची आर्थिक मदत

आलापल्ली.. दिनांक १५ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३०च्या सुमारास आलापल्ली येथील मनेवार वार्डात ओमदेवी सतीश डोके नामक महिलेवर आरोपी पती सतीश डोके यांनी कुऱ्हाडीने डोक्यावर वार केले यात तिला प्रचंड रक्तस्राव होऊन ती गंभीर जखमी झाली.

 

तीला तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने महिलेला आधी चंद्रपूर नंतर नागपूर ला उपचारासाठी हलविण्यात आले.

मात्र त्या महिलेची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे तीचे उपचाराकरिता पैसे कमी पडत असल्याचे बाब जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवारयांना कडताच यांनी महिलेच्या उपचाराकरीत वयक्तिक आर्थिक मदत केले.