
अभिषेक शुक्ला तालुका प्रतिनिधी
आर्वी येथील सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे धम्मदीक्षा दिन अशोका विजयादशमी व माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत वाचनप्रेरणा दिनानिमित्य वाचनसंस्कृतीचे महत्व व सार्वजनिक वाचनालायची भूमिका याविषयावर सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी उपस्थित ग्रंथालय संचालक मंडळ व उपस्थित मान्यवर व वाचकवर्ग
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा डॉ प्रवीण काळे रामदासजी नाखले रमेश दहाट गणेश पाटील अजय मेश्राम व आदी उपस्थित होते
वाचनसंस्कृती जपण्याशिवाय पर्याय नाही वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो म्हणून नियमित वाचनासंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांनी मह्त्वाची भूमिका निभावली आहे असे प्रतिपादन ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले
ग्रंथालयात नव्यानेच दाखल झालेले ग्रंथप्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती