छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

 

 

महाड नगरपरिषदेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला….

 

 

महाड येथे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत केलेल्या सहकार्याची दखल घेत महाड नगर परिषदेच्या वतीने याप्रसंगी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला….

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चवदार तळे येथे उपस्थित राहून महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,

 

महाडच्या मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच महाड येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करित नुतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.

 

महाड नगर परिषदेचे ही सुसज्ज अशी स्वतःची प्रशासकीय इमारत असावी असं स्वप्न दिवंगत आमदार माणिकराव जगताप यांचे होते.

 

मात्र त्यांच्या पश्चात त्यांची कन्या महाड शहराची नगराध्यक्ष असताना हे स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान महाविकास आघाडी सरकारमधील सर्वच नेत्यांच्या चेहऱ्यावर होते.

 

या नवीन प्रशासकीय इमारतीतून शहराच्या विकासाची कामे व्हावीत आणि महाड शहराचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता शुभेच्छा दिल्या.

 

याप्रसंगी महसूलमंत्री मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले, खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना.अदिती तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, स्थानिक आमदार भरत गोगावले,

 

महाड नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ.स्नेहल जगताप तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.