श्री.अनिरुद्धजी उर्फ बबलूभाऊ देशमुख यांच्या हस्ते “आनंदाचे झाड “पुस्तकाचे प्रकाशन थाटात संपन्न.

अमरावती -: पंचायत समिती भातकुली अंतर्गत जि.प.प्राथमिक मराठी शाळा कोलटेक,येथे सहा. शिक्षक पदावर कार्यरत असलेले .शैलेंद्र समाधानराव दहातोंडे यांच्या स्वलिखित द्वितीय पुस्तक “आनंदाचे झाड” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज दि.१६/१०/२०२१ ला थाटात संपन्न झाला.

 

अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा अमरावती मध्यवर्ती सहकारी बँक चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक,  श्री.अनिरुद्धजी उर्फ बबलुभाऊ देशमुख यांच्या शुभहस्ते हा प्रकाशनाचा सोहळा पार पडला.

 

कोविड काळात शाळा बंद असल्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने श्री.शैलेंद्र समाधानराव दहातोंडे यांनी लेखनाला सुरवात केली व या कोविड काळात त्यांनी दोन पुस्तके लिहिली.

आनंदाचे झाड’ या पुस्तकामध्ये शैक्षणिक,सामाजिक ,सध्याच्या कोविड परिस्थितीला अनुसरून असे एकूण पंचवीस लेखांचा संग्रह असून या पुस्तकाला श्री.ले.कर्नल श्री.लक्ष्मणजी गाले  यांची प्रस्तावना लाभली आहे.

 

श्री.अनिरुद्धजी उर्फ बबलुभाऊ देशमुख या निमित्ताने श्री.शैलेंद्र स.दहातोंडे यांना भरपूर शुभेच्छा दिल्यात.कोविड काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग लेखन कार्यासाठी केल्याबद्दल अभिनंदन सुध्दा केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्यात.

 

या प्रकाशन सोहळ्याला श्री.ले कर्नल लक्ष्मण गाले  (सामाजिक कार्यकर्ते), श्री.गजाननजी कासमपुरे (आदर्श शिक्षक) ,श्री.विनोदराव गुडदे (सामाजिक कार्यकर्ते),श्री.विशालभाऊ भट्टड (उपसरपंच, सायत),श्री.राजेंद्रजी वाघमारे  श्री.प्रकाशभाऊ कळमखेडे  ,श्री.अजय घावट सर, श्री.समाधानजी दहातोंडे (माजी उपसभापती, पं. स.भातकुली) व श्री.शैलेंद्र स.दहातोंडे ,श्री.प्रतिक प्र. कळमखेडे उपस्थित होते.