गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत
भामरागड ता.१५-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रसारक मंडळ भामरागड व दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा भामरागड यांचे संयुक्त विद्यमाने
स्थानिक बुद्ध विहाराचे प्रांगणात ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम सामुहिक त्रिशरण पंचशिलांचे ग्रहन करण्यात आले. पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष लीलाधर कसारे
यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे,
लोककवी दादाराव कुसराम,ज्ञान प्रसारक मंडळाच्या सचिव तारका टेंभुर्णे, सहसचिव सुधाकर मुरमाडे, उपाध्यक्ष नगराळे सर,सदस्य आत्माराम वैद्य,किशोर कांबळे,शिवराम गर्गम,सपना रामटेके,
तेजस्विनी ढवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.युवराज निमगडे यांनी केले.कार्यक्रमाला बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.