सुरजागड लोहप्रकल्प बंद करा अन्यथा येत्या आठ दिवसात बेमुद्दत आंदोलन करू

 

       जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

जिल्ह्यातील बहुचर्चित सुरजागड लोह प्रकल्पाच्या विरोधात जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषद बेमुदत आंदोलनाच्या पवित्र्यात, राज्य सरकार या आंदोलनाकडे लक्ष देणार का.
गडचिरोली, 14 ऑक्टोबर जिल्हयातील सुरजागड लोहखदान प्रकरण पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत आहे.

 

जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषेदेने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी तसेच यापूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ठराव देवून सूरजागड लोहखदान कायमस्वरुपी बद करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांनी दुर्लक्ष करुन लोह खदानी बळजबरीने सुरु

 

करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या विरोधात आता जिल्हा महाग्रासभा स्वायत्त परिषद सतर्क झाली असून येत्या आठ दिवसात बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून कळविले आहे.

 

जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोख खदान प्रकल्प बंद कायमस्वरुपी बंद करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

 

जिल्हाधिकाऱ्यांना अनेक निवदेने, ठराव देण्यात आले मात्र त्याकडे जाणीवपुर्वक जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांनी दुर्लक्ष केले असून लोख खदानी बळजबरीने सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

 

त्यामुळे सात दिवासाच्या आत सदर खदान बंद करण्याची विनंतीही पत्राव्दारे करण्यात आली होती. मात्र सदर खदानीत उत्खननाचे काम थांबविण्यात आलेले नसल्याने येत्या आठ दिवसांत सुरजागड लोह खदान ठिकाणी स्थानिक ग्रामसभा, सुरजागड पारंपारिक इलाका,

 

जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषद आणि खदानविरोधी भुमिकेला समर्थन असलेल्या व्यक्ती, संघटना व राजकीय पक्ष यांच्याकडून सामुहिकरित्या बेमुदत ठिय्या धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे आज जिल्हा महाग्रासभा स्वायत्त परिषदेतर्फे

 

 

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून कळविण्यात आले आहे. तसेच याकडे दुर्लक्ष केल्याने आदिवासी जनतेने सदर ठिय्या धरणे आंदोलन केल्याने उद्धवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला आपण आणि संबंधित विभाग जबाबदार असतील असे सुध्दा कळविण्यात आले आहे.

 

सदर निवेदनाची प्रतिलिपी महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री, महानिदेशक, खाण व खनिज विभाग, भारत सरकार नागपूर, जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली, अनु. जमाती आयोग, नवी दिल्ली यांना पाठविण्यात आली आहे.

 

निवदेन देतांना जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषद गडचिरोलीची सचिव नितीन पदा, माजी आमदार नामदेवराव उसेंडी,

 

जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, जि.प. सदस्य सैनुजी गोटा, लालसू नोगोटी, जि.म. स्वायत्त परिषद सदस्य नंदु मटामी, संघटक शिवाजी नरोटे, आविस प्रज्वल नागुलवार, जि.म. स्वायत्त परिषद सदस्य सुधाकर गोटा, ग्रा.पं. सदस्य मंगेश नरोटी आदि उपस्थित होते.