गडचिरोली, दि.13 : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्रशासनाने अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या इ. 1 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्याथ्यांसाठी राज्यातील मुस्लिम, क्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या
धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्याथ्यांसाठी प्री-मैट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून सुरु झाली आहे. चालू वर्षा NSP 2.0 पोर्टल वरती नवीन व नृतनीकरण विद्याथ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दि. 18 ऑगस्ट 2021 पासून सुरु झाली आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्याथ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मैट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.
इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय/निमशासकीय/खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायमविना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासनमान्यता प्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्याथ्यांसाठी ही लागू आहे. अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उतीर्ण झालेला असावा,
(केंद्रशासनाने कोविड-१९ च्या प्रार्दुभावामुळे ही अट चालू वर्षा साठी नुतनीकरण विद्यार्थ्यांसाठी शिथिल करण्यात आली आहे.) पालकाचे (कुटूंबाचे एकत्रित ) वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे ,पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.
अटी व शर्ती :- एका कुटूंबातील 2 पेक्षा जास्त विद्याथ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती , शेक्षणिक माहिती, बैंक व आधार माहिती अचूक भरावी, धर्माबाबतचे स्वयंघोषपणापत्र, उत्पन्नाचे
प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधारकार्ड/आधार नोंदणी पावती, विद्याथ्यांचा फोटो, बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करावीत ,हया शिष्यवृतीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. एकूण पात्र
विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनीसाठी राखोय आहे. विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वसतीगृहात राहत असतील अथवा राज्यशासनाच्या वसतीगृहात राहत असतील
केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वसतीगृहाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात. तसेच वसतिगृहामध्ये भरलेले शुल्काचा पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे.
सन 2020-21 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्याथ्यांनी सन 2021-22 करिता
नूतनीकरण विद्यार्थी म्हणून अन ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. नवीन अथवा नुतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल. तसेच एका विद्यार्थ्यांने नवीन नुतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील.
सूचना:- विद्याथ्यांचे बँकखाते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे, नसल्यास पालकांचे राष्ट्रीयकृत बँकखात्याची माहिती अर्जात भरता येईल. इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्या चे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0) (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील (टिप – अर्ज भरण्याची सोय
www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे.) अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे अवश्यक आहे. हा क्रमांक पालकांचा असेल तर तो 02 पाल्यांसाठीच वापरता येईल असे संचालक अल्पसख्यांक व प्रौढशिक्षण तु.ना. सुपे यांनी कळविले आहे.