जिल्हा सामान्य रूग्णालयातील एलएमओ व पीएसए ऑक्सिजन प्लान्ट तसेच रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा  संपन्न  

 

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

गडचिरोली जिल्ह्यासाठी चार वेगवेगळे ऑक्सिजन प्लान्ट मंजूर करण्यात आले असून त्यातील दोन प्लान्ट आजपासून कार्यान्वित करण्यात आले.

 

याशिवाय १४ व्या वित्त आयोगामधून आश्रम पथकाकरिता ४ रुग्णवाहिका तर उप मुख्यमंत्री वित्तीय योजने अंतर्गत ५ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रुग्णांना वेळेत आरोग्य केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी त्या निश्चितच उपयुक्त ठरतील.

 

याप्रसंगी नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे,

 

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे आणि इतर पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.