राज्यपाल .भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ गडचिरोली ते गुजरात येथील केवडिया पर्यंत सायकल रॅली चे आयोजन

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

 

सीआरपीएफ च्या विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गडचिरोली कॅम्प मध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

भारतीय राजकारणात लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्याचे निश्चित केले

 

असून गडचिरोली ते गुजरात येथील केवडिया पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली ३१ ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी केवडिया इथे पोहोचणार आहे.

 

महामहिम राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झेंडा दाखवून या सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यासमयी सादर करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमातून सीआरपीएफचे सैन्यबळ आणि आदिवासी संस्कृतीचे अनोखे दर्शन पहायला मिळाले.

 

सीआरपीएफच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक रश्मी शुक्ला, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी तसेच सीआरपीएफचे सर्व प्रमुख अधिकारी व जवान याप्रसंगी उपस्थित होते.