उत्तरप्रदेश राज्यातील लखीमपुर खीरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना चारचाकी वाहनाने चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्वस्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
देशातील शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे. अशा या कृर अत्याचारा विरुद्ध संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहेत.
महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 11ऑक्टोबर रोजी सोमवारी महाराष्ट्र बंदचे केलेल्या आवाहनाला गडचिरोली शहरात सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदला नागरिकांनी १०० टक्के सहकार्य केले.
मागणीचे निवेदन देऊन मोर्चाची सा़ंगता करण्यात आली.
या बंदमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.