सावळी बुजुर्ग झाले भाजपामय 31 काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भाजपात प्रवेश

 

आमदार दादाराव केचे यांच्या अविरत सुरू असलेल्या विकास कामे व जनतेला भेडसावत असलेल्या समस्याचे निराकरण करण्याच्या कार्यप्रणालीवर प्रभावी होत कारंजा तालुक्यातील सावळी (बु) येथील तब्बल ३१ काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते रितसर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

 

 

सावळी (बु) येथील हरीभाऊ ढोबाळे, संजय मुने उपसरपंच, उर्मिला देशमुख ग्रामपंचायत सदस्या, शालीकराम कडवे, महादेव धवराळ, भारतराम पांढूरकर, धनंजय कैलीये, रवींद्र पाटमासे, युवराज मुने, भुषण धंडाळे, मिना कवडे, सवीता ढोबाळे, ओंकार ढोबळे,

 

अंकुश पराडकर, नितिन डोंगरे, राजकुमार पांढूरकर, अविनाश ढोबाळे, किसान मुने, प्रकाश कालभुत, बबलू डिग्रसे, सागर डिग्रसे, योगेश ढोबाळे, हर्षल देशमुख, प्रमोद ढोबाळे, विजय ढोबाळे, धनराज डोंगरे, प्रमोद ढोबळे, प्रमोद गाखरे, रूपचंद ढोबाळे, दिलीप मुन्ने, मीना लाडके यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

 

 

प्रवेशकर्त्यांनी प्रवेश करते वेळी सांगितले की, आर्वी विधानसभा क्षेत्राचे स्थानिक नेतृत्व आमदार दादाराव केचे यांनी विकासात्मक दृष्टीकोनातून आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात न भुतो नेत्रदीपक विकास साध्य केला आहे आणि आताही अविरत सुरू आहे.

 

या उलट वर्षानुवर्षे काँग्रेसचे स्थानिक नेतृत्वाने सावळी (बु) गावाला विकासापासून कोसो दुर ठेवत मतदानाच्या वेळी भुलथापा देऊन गावाची दिशाभूल करत मतपेट्या पुरताच विचार केला त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी प्रवेश केला आहे.

 

प्रवेश करतेवेळी भाऊ खवशी, प्रकाश गाखरे, वासुदेव ढोबाळे, वासुदेव मुन्ने, रूपचंद ढोबाळे, रूपचंद गाखरे, सुरेश दिग्रसे, नथ्थूभाऊ डोंगरे, विजय नाखले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.