पंचायत राज समिती सदस्य मा.सदाभाऊ खोत यांची जि प शाळा हिवरा बु.येथे आकस्मिक भेट

 

विदर्भ ब्युरो चीफ -: धनराज खर्चान

नांदगाव खंडेश्वर -: तालुक्यातील हिवरा बु .येथे शालेय परिसर, वर्गसजावट, वृक्ष लागवड , शालेय दप्तर बघून त्यांनी मुख्याध्यापकासह सर्व कार्यरत शिक्षकांचे केले तोंडभरून कौतुक..

हिवरा बु शाळेतील शिक्षकांना मिळाली त्यांच्या कार्याची पावती…

गावकऱ्यांच्या सहकार्याने शालेय भौतिक सुविधाच्या विकासासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी अविरत प्रयत्न करणार…..सुरज वाघमारे ,सहा. शिक्षक ,हिवरा बु.

हिवरा बु.:-

पंचायत राज समिती चे सदस्य तथा माजी कृषी राज्यमंत्री मा.आमदार सदाभाऊ खोत यांनी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 5:15 वाजताच्या दरम्यान नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्य.शाळा हिवरा बु.येथे आकस्मिक भेट दिली
त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनंत राठोड सह ,सुरज वाघमारे ,सरोज उके ,शीतल चव्हाण हे शिक्षक उपस्थित होते
शाळेत मा.सदाभाऊ खोत यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,नंतर शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष महेंद्र बोरकर , हरिभाऊ चव्हाण (शिक्षणतज्ञ )यांच्या हस्ते आमदार सदाभाऊ खोत साहेबाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले…
नंतर कार्यालयाची पाहणी करण्यात आली , व तेथे पंचायत राज समिती चौकशी च्या दृष्टीने शाळेच्या शालेय दप्तरांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली ,मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांना शालेय पोषण आहार ,विविध शिष्यवृत्त्या , योजना ,ऑनलाइन शिक्षण अशा प्रकारच्या विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले ,मुख्याध्यापक राठोड सर तसेच सूरज वाघमारे ,उके मॅडम आणि चव्हाण मॅडम यांनी समाधानकारक उत्तरे दिली

हिवरा बु.शाळेतील अध्ययावत शालेय दप्तर , कार्यालयाची केलेली उत्कृष्ठ रंग सजावट , शालेय परिसरात केलेले वृक्षलागवड बघून तसेच गावकऱ्यांचा शाळेतील उत्कृष्ट सहभाग बघून त्यांनी मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांचे तोंडभरून कौतुक केले..
आणि सर्व शिक्षकांचे कार्य चांगले असल्याची नोंद शे-यामध्ये केली ,म्हणजे हिवरा बु येथील कार्यरत शिक्षकांना त्यांच्या केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती मिळाली असे म्हणायला काहीही हरकत राहणार नाही
..
पाऊण तास चाललेल्या या तपासणी नंतर सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले ,नंतर पूर्ण चमू तेथून रवाना झाली,

राठोड सर सह सुरज वाघमारे ,सरोज उके ,शितल चव्हाण उपस्थित होते , यावेळी गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले

गावकऱ्यांच्या सहकार्यातून शाळेच्या भौतिक सुविधा विकासासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून शाळेची पत वाढविणार असल्याचे तेथील सहायक शिक्षक सुरज वाघमारे यांनी वक्तव्य केले आहे

पंचायत राज समिती ही टीम जेव्हा शाळेत आली तेव्हा महेंद्र बोरकर(अध्यक्ष, शा. व्य.स. ) ,उज्वला टाले (सरपंच ), मयूर मेश्राम (उपसरपंच )हरिभाऊ चव्हाण (शिक्षण तज्ञ ) ,शंकरराव चव्हाण (पोलीस पाटील ) , संदीप सोळंके (पोलीस पाटील ,नागझरी) ,बाळू भाऊ ढवळे , प्रवीण मोखळे , एकनाथ रंगारी ,ज्ञानेश उगले ,विशाखा ओगले , प्रज्ञा सूर्यवंशी ,नंदा ननावरे , ज्योत्स्ना वाहाणे ,मुख्याध्यापक राठोड सर सह सुरज वाघमारे ,सरोज उके ,शितल चव्हाण उपस्थित होते , यावेळी गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले