वाघोडा येथे गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना सेवाधिकारी म्हणून हरिभाऊ कामडी यांची नियुक्ती

 

कारंजा तालुका  प्रतिनिधी धिरज कसारे

आज दिनांक 09/10/2021 शनिवार ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराजांचे विचार प्रत्येकापर्यंत तसेच घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे या

 

उद्देशाने गाव तिथे गुरुदेव सेवा मंडळाची शाखा स्थापित करून त्या माध्यमातून ध्यान , प्रार्थना , ग्रामजयंती तसेच समाजकार्य या मधून महाराजांचे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचतील या माध्यमातून आज

 

 

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कारंजा तालुका उपसेवाधिकारी श्री रमेशरावजी धंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली वाघोडा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली त्यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे वाघोडा सेवाधिकारी म्हणून श्री.हरीभाऊ श्रीरामजी कामडी यांची नियुक्ती करण्यात आली

 

व उपग्रामसेवाधिकारी श्री. भानुदास सिताराम पठाडे , कोषाध्यक्ष श्री. संजय ते. घागरे , सचिव श्री. चंद्रशेखर म. रमधम , प्रचार प्रमुख श्री. सतीश ल. गोरे , भजन प्रमुख श्री.उल्हास ल.बन्नगरे ,

 

महिला प्रमुख सौ.अनुसया शां. पठाडे , सभासद पांडुरंगजी सि.गिऱ्हाळे ,राजु बा. सोमकुवर , वसंता ह.कामडी, ललिता म.कामडी, मारोतराव गु.रमधम, किशोर वा.गोरे यांची नियुक्ती करण्यात आली

 

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे नारा सर्कल केंद्रसेवाधिकारी कु. आशिष पं. किनकर , श्री . गुरुदेव सेवा मंडळाचे नारा ग्रामसेवाधिकारी कु. धिरज ला. कसारे , सचिव कु. विष्णू र. धंडाळे , कोषाध्यक्ष चेतन दि. खानजोडे , सदस्य कु. सुनील र. बारंगे उपस्थित होते