उमंग शुक्ला प्रतिनिधी आर्वी
आर्वी येथील तऴेगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतिने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-सहा तळेगांव येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले
व दोन तास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद ठेवण्यात आला उत्तर प्रदेशातील लखिमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या हत्याकांडा करीता जबाबदार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या निषेधार्थ
तसेच श्रीमती.प्रियंका गांधी यांना बेकायदेशीर पणे केलेल्या अटकेच्या निषेधार्थ हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे महासचिव तथा
आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा तळेगाव येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते
त्यावेऴी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी नारेबाजी करुन निषेध नोंदविला त्यावेऴी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते