महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कडे कांग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष पद

 

2019 च्या विधानसभा निवडणूकीनंतर , काळाची पावले ओळखून , शरद पव़ारांनी पुढाकार घेत, सोनीया गांधीच्या आशिर्वादाने, उध्दव ठाकरे यांच्या नेत्रुत्वाखाली तिन पक्षांचे सरकार , अस्तित्वात आणले.

 

काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी असला तरी , तो दुय्यम स्थानावर असल्याचे शल्य , समस्त नेतेगण आणि जातीव़ंत काँग्रेस कार्यकर्त्यांना बोचत होते. सर्वजण, धाडसी, कार्यतत्पर, क्रियाशिल, परखड नेत्याच्या प्रतिक्षेत होते.

 

हायकम़ांडच्या धाडसी निर्णयामुळे आता ही प्रतिक्षा संपली असून , महेंद्र ब्राम्हणवाडे या़ंच्या रुपाने , गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला “ऊर्जा देणारा “जिल्हाध्यक्ष लाभला आहे.

 

विशेष म्हणजे, सर्वस्वी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सह, सारखे समतोल साधणारे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या दीमतीला रहाणार असल्याने आता ,

 

गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकट होऊन भविष्यात पक्षाला पूर्वीचे सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.