मेडिकल कालेज ला लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या 180 कामगारांना प्रत्येकी 50 हजार भरपाई द्या व त्यांच्या समस्या मार्गी लावायचे जिल्हाधिकारी यांना खासदार धानोरकर यांच्या सूचना

 

चंद्रपूर : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे निर्माणाधीन इमारत परिसरात कामगारांच्या राहण्याकरीत निवास आहेत.

 

 

दोन दिवसापूर्वी प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्या नुसार स्वयंपाक करतेवेळी घरगुती सिलेंडर लीक झाल्याने स्फोट झाला, यात १० च्या वर सिलेंडरचा स्फोट होऊन ४ कोटींच्यावर साहित्यांचे नुकसान झाले. हि घटना अतिशय गंभीर असून यात बेजबाबदार पण दिसून येत असून

 

 

कंपनीवर गुन्हा दाखल करून येथील १८० कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक सामूहिक स्वयंपाकगृह स्थापन करा अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या.

 

 

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अधिष्ठाता अशोक नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, राजेंद्र सुरपाम, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. भास्कर सोनारकर, उमेश आडे, डॉ. निवृत्ती जीवने, संजय राठोड, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, विनोद दत्तात्रय, अस्विनी खोब्रागडे, सोहेल रजा, प्रशांत भारती, उमाकांत धांडे, गोपाल अमृतकर, राज यादव, कुणाल चहारे, मतीन शेख उपस्थित होते.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मोठ्या प्रमाणात इमारतीचे बांधकाम सुरु आहे.

 

येथे जवळपास ८०० कामगार काम करीत आहे. येथील कामगार राहत असलेल्या एक इमारतीला आग लागली. त्यात कामगारांच्या जीवनावश्यक वस्तू जाळून खाक झाल्या आहेत. त्यात कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

 

या इमारतीमध्ये जाण्या येण्यासाठी फक्त दोन सीडी आहेत. त्या वाढवून चार करण्याच्या सुचाना देखील खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या. महत्वाची बाब म्हणजे येथे काम करीत असलेले कामगार हे परराज्यातील आहेत.

 

यांच्याकडे घरगुती वापराचे व व्यवसायिक वापराचे सिलेंडर एवढ्या मोठ्या प्रमाणात आले कुठून याची देखील चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी केली आहे.

 

यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी कामगारांशी संवाद साधला त्यावेळी कामगारांनी विविध समस्या सांगितल्या त्या लवकर मार्गी लावण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापनाकडे त्यांनी केल्या आहे.