अळणगांव येथे मराठा लाईट इन्फेर्टी रेजिमेंट जवानाचे जंगी स्वागत

 

विदर्भ ब्युरो चीफ -: धनराज खर्चान

भातकुली-: तालुक्यातील अळणगांव येथील रहिवासी सुरज गजानन मानकर याची ११ फेब्रुवारी २०२० रोजी मराठा लाईट इन्फेर्टी रेजिमेंट मध्ये निवड झाली ,त्यावेळी कोरोना चा वाढत प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होता,

 

त्यामुळे त्याला टेंनिगची तारीख पुढे पुढे ढकलण्यात आली होती शेवटी त्याला आक्टोबर २०२० रोजी त्याला टेनिंग साठी बोलावण्यात आले १८ आक्टोबर २०२० रोजी त्याचे टेनिंग बेळगांव (कर्नाटक) येथे सुरु झाले

 

व २आक्टोबर २०२१ रोजी टेंनिग पूर्ण झाले.टेंनिग पूर्ण झाल्यावर तो आपल्या गावी पोहचताच अळणगांव येथील गावकऱ्यांनी त्याचे ढोल ताशे वाजवून व गळ्यात हार व फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत व अभिनंदन केले.तसेच भवितव्या साठी शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते , सुरज च्या घरची परिस्तिथी हलाखीची व एकीकडे गावाबाहेरचे रस्ते अतिशय खराब त्या परिस्थितांचा सामना करत तो कधी सायकल ने तर कधी मोटारसायकलने ग्राउंड प्रॅक्टिस व क्लास करण्याकरिता अमरावती

 

या शहराकडे जात होता एवढ्या कठीण परिस्थितीवर मात करत त्याने आज यश संपादन केले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.