प्रियंका गांधी यांना झालेल्या अटके विरुद्ध अमरावती शहर काँग्रेस कमिटी तर्फे योगी सरकारचा जाहीर निषेध नोंदविला

 

विर्दभ ब्युरो चीफ //धनराज खर्चान

 

मुख्यमंत्री योगी सरकारने उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु असतांना ज्या अमानुषपणे चिरडण्याच्या प्रयत्नात

जे शेतकरी मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनासाठी शेतकऱ्यांच्या सुखा दुखःच्या साथी असलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी

या लखिमपुर सितापुर येथे भेट देण्यास जात असतांना, त्यांना उत्तर प्रदेश पोलीसांव्दारे कोणतेही वॉरंट नसतांना धक्काबुक्की करुन अटक करण्यात आली.

ही घटना भारतीय लोकशाहीच्या व सामान्य शेतकऱ्यांच्या भावनांना गळफास लावणारी घटना आहे. उत्तर प्रदेश मधील योगी सरकार यांनी

ही घटना घडवून अमानवितेचा परिचय देऊन हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुध्दा या सरकार मार्फत करण्यात येत आहे.

हा शेतकरी नरसंहार त्वरीत थांबविण्यात यावा व त्यांना न्याय देण्यात यावा. करीता या निवेदनाव्दारे अमरावती शहर काँग्रेस कमिटी जिल्हाधिकारी यांना विनंती केली की, अशा प्रकारची घटना भारतात कुठेही घडु नये ,

व लोकशाहीला तडा जाऊ नये म्हणून प्रियंका गांधी यांना अटक झालेल्या घटनेचा अमरावती शहर काँग्रेस कमिटी तर्फे तिव्र निषेध करण्यात आला व अमरावती शहर काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली की,

 

शेतकऱ्यांची व सामान्य जनतेची दखल घ्यावी असे निवेदन अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलु शेखावत यांचे तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी माजी महापौर विलास इंगोले, किशोर बोरकर, आसिफ तवक्कल, रफ्फु पत्रकार, गजानन राजगुरे, सुरेश रतावा, फिरोज खान, सौ. शोभा शिंदे, प्रा. अंजली ठाकरे, अॅडश्रीकांत नागरीकर, अॅड ऋषिकेश भुजाडे, नसिफ खान (पप्पु), यासीर भारती, निलेश गुहे, राजा बांगडे, संकेत कुलट, शिवाणी पारधी, नम्रता इंगळे, गुड्डु हमिद, आकाश तायडे, रज्जु बाबा, किशोर रायबोले, मुकेश छांगाणी, रफिक भाई चिकुवाले, शाहिन शाह, अब्दुल तालिब, दिपक घरडे, नुर खान, डॉ. जुबेर, खोजयमा खुर्रम, समिर पठाण, देवयानी कुर्वे, रजा खान, निर्मल मिनोत, अॅड स्वप्निल बवरके, अॅङ विशाल मानकर, अॅड जुबेर अहेमद, अॅड, प्रेम दामोधर, नसीर खान सादीक खान, अनीस खान, अस्लम सलाट, वैभव भोरे, धम्मपाल वराळे, पवन गावंडे, रशीद पठाण, अब्दुल नईम, निसार अहेमद खान, गजानन कापुसकर, पिंटु यादव, शुभम यादव, मयुर ढोके, शरद ठोसरे, श्याम प्रजापती आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.