भर दिवसा झाले वाघाचे दर्शन ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 

प्रतिनिधी // कृनाल राऊत

गडचिरोली : सविस्तर वृत्त असे की आज सकाळी अंदाजे 10.30 वाजता पोर्ला ते वडधा रोडवरती  वाघाचे दर्शन नागरिकांना झाले गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये वाघांनी धुमाकूळ घातला आहे गेल्या दोन दिवस आगोदर चामोर्शी तालुक्यात एका व्यक्तीला वाघाने ठार मारले या घटने मुळे संपूर्ण परिसर हादरला होता लगेचच ह्या वाघाचे भर दिवस दर्शन व वाघ मुक्त पणे फिरताना बघून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी या वाघाला संबंधित विभाग कधी जेरबंद करेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे