अळणगाव येथे प्रधानमंत्री ग्राम सभा व संवाद उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद

 

विदर्भ ब्युरो चीफ -: धनराज खर्चान

भातकुली -: तालुक्यातील अळण गांव येथे केंद्र सरकार तर्फे देशातील सर्व गावातील पानी समिती सदस्यांसोबत प्रधानमंत्री यांनी जल जिवन मिशन अंतर्गत ग्राम सभा आणि संवाद उपक्रमांतर्गत संवाद साधला. गांधी जयंती निमित्त स्वच्छता मिशन त्याच बरोबर जल जिवन मिशन सुरु आहे.

 

या मिशन अंतर्गत स्वच्छता व पाण्याचे महत्व सर्व देशवासीयांना समजाऊन सांगीतले जाते. याच पार्श्वभुमिवर देशातील सर्व सेतु संचालकांमार्फत या कार्यक्रमाला गावपातळीवरील लोकांना दाखविण्यात आले.

 

या अनुषंगाने अळनगाव येथील इमरान शाहा अयुब शाहा या सेतु संचालकाने गावातील काही प्रतीष्ठीत मंडळींना या कार्यक्रमाचे लाईव टेलीकास्ट दाखवुन या कार्यक्रमाला सफल बनविन्यासाठी प्रयत्न केले.

 

यावेळी वासुदेवराव खर्चान, अयुब शाहा, जाबीर शाहा,एकनाथ बघे,सुभाष बडगे, योगेश रोकडे, उकंडराव चव्हान व इतर काही गावकरी उपस्थित होते.