बस च्या चाकाखाली दबून महिला जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक बस चालकांवर गुन्हा दाखल

 

 

गडचीरोल्लो : शहराच्या कॉम्प्लेक्स परिसरातून गडचीरोल्ली शहराकडे येणाऱ्या महामंडळाच्या बसमध्ये चढत असताना महिला कंडक्टर ने अचानक बेल मारल्यामुडे ड्रायव्हर ने गाडी समोर घेतली बस चे दार पूर्णपणे बंद न झाल्या कारणाने एक महिला फरफटत गेली काही प्रवाश्यांनी बस

 

थांबविण्याकरिता आवाज मारले असता काही अंतरावर गेल्यानंतर ड्रायव्हर च्या लक्षात येताच ब्रेक मारत असताना ती महिला चाकाखाली दबून जखमी झाली

 

सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून बस चालकाच्या नावावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला कंडक्टर वर कोणतीही कारवाही करन्यात आली

 

नाही सदर घटनेची माहिती पोलिस सूत्रांकडून जाणून घेतली असता सदर बस चंद्रपूर डेपो ची असून अपघात काल दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडलेला आहे.

 

जखमी झालेल्या महिलेचे नाव वंदना विलास सहारे वय ३० वर्ष राहणार पारडी असून तिला सामान्य रुग्णालयात

 

उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले असताना, प्राथमिक उपचार दिल्यानंतर अचानक पणे प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे.
पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.