वाढत्या महागाईच्या विरोधात नागपूर मनसे प्रणित वाहतूक सेनेचा मोर्चा

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर तर्फे आज पेट्रोल डिझेल व इतर जीवनावश्यक वस्तू दरवाढीच्या विरोधात संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर असा निषेध मोर्चा काढण्यात आला

 

संविधान चौक येथे मनसे पदाधिकारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली.
पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा
केंद्र सरकारचा निषेध असो राज्य सरकारचा निषेध असो घरगुती गॅसच्या किंमती कमी करा जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करा अश्या विविध घोषणा देत मोर्च्यात सामील मनसैनिक ,

 

वाहतूकदार यांनी आपल्या दुचाकी, तीन चाकी गाड्यांना धक्का देत मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालय कडे वळविला पण पोलिस प्रशासनाने मोर्चाची परवानगी नाकारत आकाशवाणी चौकाच्या अगोदर मनसेचा निषेध मोर्चा अडविला.

 

मनसेचे शिष्टमंडळ प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात पोलिस वाहनाद्वारे विभागीय आयुक्त सौ. प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांच्या भेटीस गेले व त्यांना सतत वाढत असलेला महागाईचा भस्मासुर केंद्र व राज्य सरकारने रोखण्याबाबत निवेदन सादर केले.

 

. यानंतर मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की,

 

जनतेच्या भावनांशी खेळणारे हे निष्ठुर केंद्र व राज्य सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आली आहेत,त्यांना महागाईने होरपळून गेलेल्या जनतेचा विसर पडला आहे

 

यांना आता येणाऱ्या निवडणुकात हिच माय बाप जनता सत्तेवरून खाली खेचून त्यांची जागा निश्चित दाखवेल असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी केले .

 

वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक सचिन धोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कोरोनाच्या कठीण काळात सुध्दा सरकारने वाहतूकदारांना वाहनांची बँक किस्त भरण्याबाबत कुठलाही दिलासा दिला नाही.

 

खाजगी असो वा सरकारी बँक यांचे वसुलीपथक वाहतूकदारांवर हफ्ते भरण्यासाठी दबाव टाकतात, त्यांची वाहने जप्त केली जातात.

 

फक्त सरकारी आणि बँकेचे नियम पुढे करून सामान्य ऑटो चालक , टेम्पो चालक व इतर वाहतूकदार यांना वेठीस धरले जाते या निकामी अविश्वासू सरकारचा निषेध करा

 

शहर अध्यक्ष विशाल बडगे यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी,

 

मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, जिल्हा अध्यक्ष सतीश कोल्हे व किशोर सरायकर, उप शहर अध्यक्ष प्रशांत निकम,आयोजक व वाहतूक जिल्हा संघटक सचिन धोटे, व शहर संघटक मंगेश शिंदे मनसे शहर सचिव शाम पूनियानी व घनश्याम निखाडे,

 

महिला सेना जिल्हा अध्यक्षा श्रीमती अचला मेसन व कल्पना चौहान, महिला शहर अध्यक्षा संगीता सोनटक्के व मनीषा पापडकर, मनविसेचे आदित्य दुरुगकर व दुर्गेश साकुलकर मनोज गुप्ता, उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर,

 

मध्य विभाग अध्यक्ष शशांक गिरडे, दक्षिण पश्चिम विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उत्तखेडे, दक्षिण विभाग अध्यक्ष पिंटू बिसेन, नागपूर ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश भोयर, बीजाराम किंनकर अनिल पारखी, दीपक ठाकरे, दीपक नासरे, सचिन टीचकुले,

 

, गजानन टिपले, पवन साहू अभय व्यवहारे, अमर भारद्वाज, विभाग सचिव महेश माने, गुड्डू मिश्रा, सुजित मधुमटके, महिला विभाग अध्यक्षा रचना गजभिये,स्वाती जैस्वाल, मंजुषा पाणबुडे, सुनिता कैथैल ,

 

मनीषा पराड,पूनम छाडगे, शाखा अध्यक्षा वैशाली फुलझेले व अनु सहारे, गणेश मुद लियार, वैभव पराते,अजय सिरसवार, नरेंद्र पाटील, अभिषेक डे , नितीन वाकोडे,समीर अरबट, सत्यजीत उईके, अजय मारोडे, व असंख्य इत्यादी मनसे पदाधिकारी व वाहतूकदार उपस्थित होते.