प्रभाग क्रमांक ९ मधील अर्धवट नाली बांधकामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका..

 

कारंजा तालुका प्रतिनिधी धिरज कसारे

कारंजा (घा) : प्रभाग क्रमांक ९ मध्ये मनोज अग्रवाल ते श्री. ढोबाळे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकामाला नगरपंचायतने नियुक्त केलेल्या ठेकेदारांमार्फत काही दिवसापूर्वी सुरुवात करण्यात आली. नालीचे खोदकाम केले परंतु त्यानंतर मागील एक महिन्यापासून या नालिकडे संबंधित ठेकेदाराने कधी येऊनच बघितले नाही. खोदकाम केल्याने सर्व लोकांचे सांडपाणी येथे जमा होत आहे. पाणी वाहून जाण्याचा कुठलाही मार्ग नाही, त्यामुळे पाणी जागेवरच साचून त्यापासून दुर्गंधी निर्माण होऊन अनेक प्रकारचे रोग येथील नागरिकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका यांनी नगरपंचायत प्रशासनाला व पदाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही सत्ताधारी यांच्या विरोधातील नगरसेविका या प्रभागांमध्ये असल्याने पदाधिकारी मंजूर असलेले कामे करण्यास टाळाटा करत असल्याचे नगरसेविका सुवर्णा कावडकर यांचे म्हणणे आहे. सदर अर्धवट नाली बांधकामाची लेखी तक्रार 21 सप्टेंबर रोजी नगरसेविका यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केलेली आहे.नव्याने रुजू झालेले नगरपंचायत चे मुख्याधिकारी शहा यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढून अर्धवट नालीचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.. नालीचे कामं पुर्ण झाल्यास नागरिकांची सोय होईल व दुर्गंधी पासून बचाव होवून कुणाच्याही आरोग्याला धोका निर्माण होणार नाही..