कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

 

जगातील प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि भारतातील सर्वोत्तम विनोदी कलाकारांपैकी एक असलेले राजू श्रीवास्तव आता या जगात नाहीत. बुधवारी त्यांनी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीवन आणि मृत्यू यांच्यातील 40 दिवसांची लढाई लढल्यानंतर आज या कॉमेडियनचे निधन झाले.

सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना वाचवू शकले नाहीत आणि सर्वांना रडवून सर्वांना हसवणारा विनोदवीर या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेला.