
धिरज कसारे //तालुका प्रतिनिधी कारंजा
कारंजा – शहरातील खर्डीपुरा परिसरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये दुपारच्या सुमारास राहत्या घरात खुनाचा थरार घडला. यात अज्ञात आरोपीने झोपेत असलेल्या इसमाची हत्या करण्यात आली.
मृतक रत्नाकर सावरकर वय 52 वर्ष रा.लोहरी सावंगा रहिवाशी असून सध्या कारंजा शहरात आपल्या पत्नी सोबत राहत होता.यांचा गावातील घराशेजारी असलेल्या चाफले कुटुंबाचा वाद होता, या वादातून मृतकच्या कुटुंबानी आरोपी बाली उर्फ सविता चाफले यांच्या भावाची पावणे दोन वर्षांपूर्वी हत्या केली होती.या प्रकरणात मृतकसह पत्नी वडील जामिनीवर सुटले होते त्यानंतर ते कारंजा येथे राहत होते.मृतक यांचा मुलगा गौरव सावरकर हा काल जामीनवर सुटला.याची माहिती आरोपिताना पडताच त्याला ठार करण्याची सुपारी आरोपी सविता हिने इतर आरोपीने दिली. त्यांनी गौरव सावरकर हा घरात झोपून असल्याचा अंदाजवरून त्याच्या वडिलांची झोपेत हत्या केली.यात त्याच्या अंगावर चार ते पाच धारदार शस्त्रने वार करत अज्ञात आरोपी पळून गेले.मृतक हा जखमी अवस्थेत घराबाहेर पडताच अंगणात बेशुद्ध होऊन जागीच ठार झाला.याप्रकरणी बाली उर्फ सविता चाफले सह दोन अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत गोहत्रे, लीलाधर उकंडे,अतुल अडसड, निखिल फुटाणे, उमेश खामनकर, सागर होले, खुशाल चाफले तपास करत आहे.