वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही अट्टल दुचाकी चोर ताब्यात

 

वर्धा: शहरातील गुन्हयाची हकीकत याप्रमाणे आहे की, फिर्यादी नामे आकाश अविनाश दुरतकर, वय 37 वर्ष, धंदा नौकरी, रा. गाडगे नगर, पुलगाव हे पंजाब नॅशनल बॅक, वर्धा येथे नौकरीवर असुन ते दिनांक 17.09.2022 रोजी सकाळी आपले राहते घरून पुलगाव येथुन आपले स्वताचे मालकीची होन्डा युनिकाॅर्न मोटर सायकल क्रमांक एम.एच.32 ए.टी.5421 ने सकाळी 10.30 वा. बॅकेत आले. मोटर सायकल बॅके समोर रोडचे बाजुला सुरक्षित उभी केली पंरतु मोटर सायकलची चाबी काढण्यास विसरले व बॅकेत काम करीत बसले. दुपारी 02.00 वा. लंन्च ब्रेक झाल्याने ते बॅकेचे बाहेर आले असता, त्याना त्याची गाडी खाली त्यानी ठेवल्या ठिकाणी दिसुन आली होती. त्यानंतर ते लंन्च ब्रेक संपल्याने ते पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाले. सायंकाळी 18.00 वा. बॅक बंद झाल्या नंतर ते घरी जाण्याकरीता गाडी ठेवल्या ठीकाणी आले असता, त्यांना त्याची गाडी दिसुन आली नाही आजु बाजुला शोध घेतला मिळुन आली नाही. त्यावरून त्यानी दिनांक 18.09.2022 रोजी त्याची होन्डा युनिकाॅर्न मोटर सायकल क्रमांक एम.एच.32 -ए.टी.-5421 किंमत 90000/- रू ची कोणीतरी अज्ञात चोरटयाने दिनांक 17.09.2022 रोजी दुपारी 14.00 वा. ते 18.00 वा दरम्यान चोरून नेली अशा पो.स्टे. वर्धा शहर येथे दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, वर्धा शहर अप क्रमांक 1400/2022 कलम 379 भांदवि अन्वये नोंद करण्यात आला होता सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबिर कडुन मिळालेल्या माहिती वरून सदर गुन्हयातील आरोपी नामे राहुल लोभास धोटे, वय 35 वर्ष, रा. सुभाश चौक, गोड प्लाॅट, वर्धा यास मच्छी मार्केट इतवारा बाजार, वर्धा येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन सदर गुन्हयातील चोरी गेलेली होन्डा युनिकाॅर्न मोटर सायकल क्रमांक एम.एच.32 -ए.टी.-5421 किंमत 90000/- रू तसेच पो.स्टे. वर्धा शहर अप क्रमांक अप क्रमांक 1396/2022 कलम 379 भांदवि मधील गोड प्लाॅट वर्धा येथुन चोरीस गेलेली एक पांढ-या रंगाची होन्डा एक्टीवा मोपेड गाडी क्रमांक एम.एच.32 झेड 3160 अंदाजे किंमत 35000/- रू ची अशा दोन गाडया सदर आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आल्या आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक मा. यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. पियुष जगताप यांचे मार्गदर्षनात व पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे निर्देषानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा सचिन इंगोले, संजय पंचभाई, सुभाष गावंडे,दिपक जंगले,राजेंद्र ढगे, राहुल भोयर, दिनेश आंबटकर सुभाष सलामे यांनी केली.