कारंजा तालुका प्रतिनिधी// धिरज कसारे
कारंजा तालुक्यातील नारा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची दैना अवस्था झाली आहे हा दवाखाना श्रेणी ब मध्ये असून या ठिकाणी डॉक्टर ला जनावराचा उपचार करणे कठीण झाले आहे कधी समाज भवनाची भिंत अंगावर कोसळेल हे सांगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली मोठी दुर्घटना ही होण्याची शक्यता आहे पशुवैद्यकीय डॉक्टर आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी जनावराचा उपचार करतात नारा येथे जनावरांच्या उपचारासाठी वाघोडा अजनादेवी बेलगाव सावरढोह या ठिकाणाहून उपचार घेण्यासाठी शेतकरी आपले जनावरे घेऊन येतात मात्र गेल्या कित्येक वर्षापासून नारा येथील दवाखाना ग्रामपंचायतच्या समाज भावनांमध्ये आहे या समाज भवनाची दैनावस्था पाहिली तर त्या ठिकाणी बसणे कठीण झाले आहे या समाज भवनाच्या भिंतीला मोठ मोठया भेगा पडल्या आहे त्या ठिकाणी अर्धा ते एक फूट पाणी साचले राहतात ग्रामपंचायतीने लक्ष देणे महत्वाचे आहे
कारंजा तालुक्यात नारा हे गाव महत्त्वाचे असून येथे सुसुंद्रा बेलगाव सावर्डोह आजनादेवी खापरी वाघोडा या ठिकाणाहून उपचाराकरिता जनावरे घेऊन शेतकरी येत असतात जवळपास या गावांमध्ये तीन ते चार हजार गोधन असल्यामुळे नारा येथे दवाखाना होणे हे अपेक्षित आहे मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन व्यवस्थेच्या ढीसाळ कारभारामुळे हा प्रश्न प्रलंबित असल्याचे नागरिकाकडून सांगण्यात येत आहे.