कारंजा (घा) तालुका विधी सेवा समिती, अधिवक्ता संघ व मॉडेल हायस्कूल कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायाधीश मा. श्री. व्ही. एस. वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत मॉडेल हायस्कूलच्या परिसरात ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन संपन्न झाला.
आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने साक्षरतेचे महत्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्याचे १९६६ पासून ठरविले.
त्या अनुषंगाने संपूर्ण जगभर साक्षरतेचा प्रचार, प्रसार व जनजागृती करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या स्तरावर दरवर्षी साक्षरता दिन शिक्षण विषयक जनजागृतीच्या उद्देशाने साजरा केला जातो.
तालुका विधी सेवा समिती कारंजा, अधिवक्ता संघ कारंजा व मॉडेल हायस्कूल कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण विषयक जनजागृती करण्याकरिता व साक्षरतेचे महत्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरता साक्षरता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश मा. श्री. व्ही. एस. वाघ , मुख्याध्यापक श्री. टोपले एड. श्री. पराडकर व शिक्षक श्री. विनोद चाफले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश मा. श्री. व्ही. एस. वाघ, प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री एम. बी. टोपले, अध्यक्ष अधिवक्ता संघ एड. श्री. जे. डी. टोपले, सहा. सरकारी अभियोक्ता श्री. एस. सावलकर, उपाध्यक्ष अधिवक्ता संघ एड. श्री. ए .पी. पराडकर, अधिवक्ता संघाचे एड. श्री. धारपुरे, एड. गाखरे, एड. श्री. दुपारे, श्री. एस. पी. नारखेडे सहा. अधिक्षक व इतर न्यायालयीन कर्मचारी तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहा. शिक्षक श्री. विनोद चाफले यांनी केले तर प्रास्ताविक अधिवक्ता संघाचे सचिव एड. श्री डी.एम धांदे यांनी केले. तर आभार वरिष्ठ लिपिक दिवाणी न्यायालय श्री. एम. ए. डोईजड यांनी व्यक्त केले.