मरनेली येथील अतिक्रमण शेतकऱ्यांना अभिलेख पंजी व अतिक्रमण पुरावा द्या. निवेदनातून मागणी

 

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी / / इशांक दहागावकर

मरनेली येथील अतिक्रमण शेतकऱ्यांना अभिलेख पंजी व अतिक्रमण पुरावा देण्यासंदर्भात तहसीलदार अहेरी यांना निवेदन देण्यात आला.
सादर निवेदन हे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांच्या सूचनेनुसार, मौजा – मरनेली गावामध्ये सण 2005 पुर्वी अतिक्रमण केलेले 57 शेतकऱ्यांना अभिलेख पंजी आणी अतिक्रमण पुरावा/पावती देण्यात यावे. या करीता निवेदन देण्यात आला.
सादर निवेदन श्री दिनकर खोत साहेब, नायब तहसीलदार अहेरी यांनी स्वीकारले.
यावेळी देतांना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधान सभा अध्यक्ष श्री लक्ष्मण येररावार, येरमनार चे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, श्री लक्ष्मण झाडे, श्री पोचन्ना अलोने,श्री लक्ष्मण डोंगरे, श्री मधुकर झोडे, श्री सुनील झाडे, श्री पुनाजी बोरकुटे सह अतिक्रण शेतकरी उपस्थीत होते.