आर्वी तालुक्यातीलबँक ऑफ इंडिया आर्वी शाखेच्या 117 वर्धापनादिनानिमित्त गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी कचरा संकलन करण्याकरिता दहा कचऱ्या पेट्या भेट म्हणून देण्यात आल्या .तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
११७ व्या वर्धापन निमित्ताचा निमित्त साधून बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक पुरुषोत्तम गवई, एग्रीकल्चर क्रेडिट मॅनेजर स्वप्निल सांगळे, प्रणित रामटेके, आणि इतर सर्व बँक ऑफ इंडियाचे कर्मचाऱ्यांनी गांधी विद्यालय मध्ये येऊन प्राचार्य श्रीमती उषाताई नागपुरे एनसीसी छात्रसैनिक यांना स्वच्छता मोहिमेअंतर्गत दहा कचरा पेट्या भेट म्हणून दिल्या तसेच विविध वृक्षांची लागवड विविध प्रकारचे रोपटे मुलांच्या हस्ते लावण्यात आले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे तसेच आभार प्रदर्शन विश्वेश्वर पायले यांनी केले