जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा डोंगरगांव येथे शिक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निखीजी धार्मिक यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

आरमोरी // तालुक्यातील डोंगरगांव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा डोंगरगांव येथे शिक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाची सुरवात माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निखीजी धार्मिक यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली . कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सोमनकर सर ,बोरकर सर ,गेडाम सर ,मेश्राम सर ,भोगे सर ,मने मॅडम ,चापले मॅडम उपस्थित होते .याच कार्यक्रमाचा अवचित्य साधुन शाळेत विद्यार्थी मनोगत व मार्गदर्शन करण्यात आले यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते