एटापल्ली जाणाऱ्या बस ला सुरजागड प्रकल्पाच्या ट्रक ने दिली धळक

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर

आल्लापल्ली : आज सकाळी 7 च्या दरम्यान एटापल्ली रोड वर अहेरी गडचिरोली बस ला सुरजागड लोहप्रकल्पातील मालवाहतूक ट्रक ने धडक दिल्याची घटना घडली आहे

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की अहेरी आगारातील बस क्रमांक MH-40 X-6094 क्रमांकाची बस अहेरी वरून एटापल्ली मार्ग गडचिरोली जात असतांना सुरजागड प्रकल्पातील विरुद्ध दिशेने येऊन बस ला धळक दिली यात बस चालकाला पायाला गंभीर दुखापत झाली आहे व ट्रक चालक धळक देताच तिथून पसार झालेला आहे विशेष म्हणजे सुराजागड लोहप्रकल्पावरून येणाऱ्या ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक केली जाते तालुक्यात ही घटना पहिली नसून अश्या अनेक घटना घडल्या आहेत दोन दिवसांपूर्वी धंनूर फाट्याजवळ ही सुरजागड प्रकल्पातील वाहतूक करणाऱ्या ट्रक ने सामोरा समोर धडक दिल्याची घटना घडली होती अश्या या सुरजागड प्रकल्पातील वाहतूकी मुले तालुक्यातील नागरिक त्रस्त झालेली आहे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे संबंधित विभाग या घटनांकडे कधी लक्ष देणार या कडे लक्ष लागले आहे नागरिकांमध्ये असंही बोलले जाते की प्रकल्पातूल मालवाहतूक ट्रक चालक ही नशेमध्ये असतात