आज दि. २८ सप्टेंबरला एटापल्ली येथे विदर्भाला महाराष्ट्र राज्यात सामील करण्यास भाग पाडलेल्या
नागपूरकराराची होळी करून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या विदर्भाचे नेहमी शोषण करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला
तर स्वतंत्र विदर्भाचा आवाज बुलंद करून केंद्र सरकारने त्वरीत विदर्भ राज्याची निर्मीती करावी यासाठी निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
२८ सप्टेंबर १९५३ साली विदर्भाचे व उर्वरीत महाराष्ट्राचे काही काँग्रेस नेते एकत्र येऊन त्यांनी एक नागपूर करार केला. विदर्भाला या नागपूर करारातील ११ कलमानुसार महाराष्ट्र राज्याच्या नौकरीमध्ये उच्च पदाच्या नौकऱ्यामध्ये, विकासाच्या निधीमध्ये,
मंत्रीमंडळामध्ये, महामंडळामध्ये २३ टक्के वाटा देऊ असे कबूल करून विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करून घेतले व तेव्हापासूनच विदर्भाचे शोषण सुरू झाले. विदर्भ राज्यावर अन्याय सुरू झाला. तो आजपर्यंत सुरूच आहे.
विदर्भातील तरुणाला २३ टक्के नौकरी देण्याचे नागपूर करारामध्ये मान्य केले
परंतु नौकऱ्या फक्त ७ टक्केच दिल्या, ४ लाख नौकऱ्या पळविल्या म्हणून विदर्भात बेरोजगारांची फौज उभी झाली. ७५ हजार कोटी सिंचनाचे पळविले, ५० हजार कोटी रस्त्याचे पळविले म्हणून विदर्भातील गोसीखुर्द सह १३१ धरणे अपूर्ण राहीले व रस्त्याचे जाळे सुद्धा विदर्भात उभे राहू शकले नाही.
विदर्भाच्या विकासाला निधीच दिला नाही म्हणून विदर्भ बेरोजगारग्रस्त, आत्महत्याग्रस्त नक्षलग्रस्त, कुपोषणग्रस्त राहीला. विदर्भाचे शोषण करून पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला व विदर्भाला कोरडेच ठेवले.
ज्या नागपूर कराराचे पालनच केल्या गेले नाही व या करारानुसारच विदर्भाला महाराष्ट्रात सामील केले त्या कराराची आज विदर्भभर होळी करून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.
काँग्रेस पक्षानेही स्वातंत्र्या अगोदर सात अधिवेशनात वेगळ्या विदर्भाची मागणी करून स्वातंत्र्यानंतर सत्तेत आल्यावर दार आयोग, जेव्हीपी कमीशन, फजल अली आयोग, संगमा आयोग बसवून त्यांनी स्वतंत्र विदर्भाची शिफारस केल्यावर सुद्धा काँग्रेसने विदर्भातील जनतेची मते घेतली परंतु ६० वर्ष सत्ता भोगल्यावर सुद्धा स्वतंत्र विदर्भ दिला नाही व विदर्भाच्या जनतेची फसवणूक केली. तर भाजपाने सुद्धा भुवनेश्वरमध्ये कार्यकारिणीचा १९९७ ला वेगळा विदर्भाचा ठराव करून तिन लहान राज्य दिली,
निवडणूकीत विदर्भाचे आश्वासन देऊन विदर्भातील जनतेची मते घेतली परंतु केंद्र सरकारमध्ये ७ वर्ष झाली भाजपाचीच सत्ता आहे परंतु त्यांनीही विदर्भ दिला नाही, विदर्भातील जनतेची फसवणूक केली आहे. दोन्ही पक्ष विदर्भाला बेईमान झाले.
आज विदर्भ करार जाळून महाराष्ट्राचा निषेध करून प्रचंड घोषणाबाजी करून स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहीजे यासाठी निदर्शने करण्यात आली व भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला आवाहन करण्यात आले की तुम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्वरीत विदर्भ राज्याची निर्मिती करा अन्यथा विदर्भातून तुमच्या पक्षाला जावे लागेल. ”
आजच्या या “नागपूर करार जलाओ” आंदोलनात
श्री, सचिन मोतकुरवार , श्री महेश पुल्लूरवार, श्री विजय नालावार, श्री ओमकार पूजलवार, श्री किशोर चंकापुरे व इतर विदर्भवादी नागरिक उपस्थित होते