माजी नगरसेवकावर शेजारच्या दुकानदाराने सत्तुराणे केले सपा सप वार प्रकृती गंभीर

 

 

विलास तुमाने ह्यांचे लहान भाऊ राहुल यांच्या शेजारचा दुकानदार दुर्गे ह्याचेशी वाद झाला त्यामुळे राहुल ह्याने विलास तुमाने ह्याला दुकानात बोलावले.

 

तिथे त्यांच्यात परत वाद झाला. दरम्यान दुर्गे नामक दुकानदाराने विलास तुमाने ह्यांचे वर सत्तुरने सपासप वार केल्यामुळे त्यांचा गाल कापल्या गेल्याची चर्चा असुन सत्तुरचा वार गळ्यावर सुद्धा झालेला आहे.

 

तर प्राप्त माहितीनुसार आरोपी दुर्गे बंधूंना सुद्धा दुखापत झाली असुन त्यांना हातावर टाके घालण्यात आल्याचे समोर येत आहे.

जखमी अवस्थेत असलेल्या माजी नगरसेवक विलास तुमाने ह्यांना राजुरा येथिल उपजिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. खाजगी रुग्णालयाने प्रकृती बघता शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्याने

 

जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सावंगी येथिल वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.