केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेमध्ये वरोरा (जि. चंद्रपूर) येथील आदित्य जिवने यांनी अभूतपूर्व यश संपादन केल्याबद्दल पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रत्यक्ष निवासस्थानी जाऊन त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी असे म्हटले की नेत्रदीपक यशाबद्दल अभिमान वाटतो. याप्रसंगी आदित्यच्या आईवडीलांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन केले.