चुकीला माफी नाही रस्त्याच्या दुर्दशेबद्दल संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाही करण्याचे आयुक्तांनी दिले निर्देश

 

सततचा पाऊस आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गेले चार-पाच दिवस ठाणेकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन आज ठाणे_महापालिका, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक_बांधकाम_विभाग,

मेट्रो आणि एनएचएआय आदी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह आनंदनगर चेकनाका ते गायमुख तसेच पडघ्यापर्यंतच्या रस्त्यांची आणि खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली

रस्त्याच्या दुर्दशेबद्दल संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांना निर्देश दिले….

पावसाळ्याआधी खड्डे बुजवून देखील पुन्हा खड्डे कसे पडले, याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश महापालिका आयुक्तांना देत इथून पुढे हे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही यासमयी दिला.