आमदार रवी राणासह पंचवीस शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता तिवसा न्यायालयाचा निकाल

 

विदर्भ ब्युरो चीफ धनराज खर्चान

अमरावती -: मागील वर्षीच्या दिवाळीला बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते..

 

.त्यावेळी तिवसा पोलीसांनी आमदार रवी राणा,कार्यकर्ते व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून तीन दिवस कारागृहात रवानगी केली होती,

 

तेव्हा आज दिनांक21 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी तिवसा न्यायालयात सुरु असता न्यायालयाचे न्यायधिश श्री.कोरडे यांनी

 

कलम 341,269,188,143,135 या विविध कलमातुन आमदार रवी राणा सह कार्यकर्ते, शेतकरी यांची निर्दोष मुक्तता केली,

 

यावेळी राणा यांचे वतीने ऍड. आशिष लांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली होती तर न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात आमदार राणा व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले…