
प्रतिनिधी -: धनराज खर्चान
अमरावती -: येथील बहूआयामी व समाजाभिमुख व्यक्तिमत्व ऍड. प्रभाकर वानखडे यांची ग्राहकाचे सर्वांगीण हित जोपासणाऱ्या
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या अमरावती जिल्हा विधी सल्लागार पदी एकमताने निवड करण्यात आली.
सदरील निवड संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन मुदगल यांनी 5 सप्टेंबर रोजी स्थानिक आदर्श नगर येथे पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत केली याप्रसंगी उपाध्यक्ष नितीन घोंगडे, जिल्हा सचिव रवींद्र रडके, सपंर्क प्रमुख प्रशांत चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
ग्राहक परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्यात येईल
असे ऍड. प्रभाकर वानखडे यांनी निवडी प्रसगी सांगितले.ग्राहक परिषदेच्या वतीने ऍड. वानखडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा हि देण्यात आल्यात.