अळणगांव -कुंड खुर्द रस्ता मृत्यूचा सापळा वाहन चालकांची तारेवरची कसरत  लोकप्रतिनिधी,जिल्हापरीषदेचे दुर्लक्ष

 

भातकुली तालुका अंतर्गत येत असलेल्या अळणगांव कुंड (खुर्द)रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून , या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता आहे की मृत्यूचा सापळा असा प्रश्न दोन्ही गावातील नागरिकांना व वाहन चालकांना पडलाय ;

 

मागील १० ते १५ वर्षांपासून या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषदेने गांभीर्याने लक्ष घातले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या रस्त्याची दुरावस्था झाली असून ; प्रवाशांना व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 

या रस्त्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याचे ही प्रमाण वाढले असून इतकेच नव्हे तर या रस्त्यांनी दवाखान्यात जातांना तीन लोकांचे जीव सुद्धा गेले.अनेक वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे .

 

अळणगांव ते कुंड (खुर्द)४ कि.मी.अंतर असून हा रस्त्या जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत येत असून या रस्ताची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून जागोजागी खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्याची संख्या मोठी असल्याने खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

 

अळणगांव येथील नागरिकाची मोठी बाजारपेठ हि अमरावती शहराची असल्यामुळे त्यांचा दररोजचा संपर्क शहराशी येत असून त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ जास्त असते.रस्ताच्या दुरावस्थे मुळे प्रवासात व वाहन चालकांना याचं जीवघेण्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे

 

लोकप्रतिनिधींना व जिल्हा परिषदेला वारंवार ग्राम पंचायतचे ठराव व निवेदन दिले असता त्याचे हे म्हणणे आहे की अळण गांव व कुंड हि दोन्ही गावे पेढी प्रकल्प बुडीत क्षेत्रात येत असल्यामुळे येथे कसलाही विकास व रस्ते दुरुस्ती करता येत नाही.

 

दोन्ही गावातील नागरिकांचा जनप्रतिनिधींना सवाल आहे की तुम्हाला प्रकल्प बाधित रस्त्याचा विकास करता येत नाही तर मग

ग्राम पंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद , विधानसभा , लोकसभा, या निवडणूक कशा घेता येतात ?

 

जर मग रस्त्याचा विकास नाही तर निवडणूक कशाला ? जर या वेळेला अळण गांव कुंड (खर्द) रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे असे मत गावातील नागरिकांचे आहे

 

आता तरी जनप्रतिनिधी व जिल्हा परिषद यांना रस्त्याबाबत केव्हा जग येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे