आष्टी येथे शिक्षक दिनानिमित्त व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त निशुल्क कॅन्सर रोगावर रोगनिदान व जनजागृती व्याख्यान शिबिराचे आयोजन 

 

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती -: भातकुली तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम आष्टी (कोळ्यांची) दि.५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री गुरुदेव बहुउद्देशीय जनजागृती प्रबोधनी वाचनालय येथे ग्रामपंचायत कार्यालया द्वारे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

शिबिर मध्ये कॅन्सर या रोगाची तपासणी महिलांची सामान्य आरोग्य तपासणी सोबतच स्तनाचा कॅन्सर व गर्भाशयाचा कॅन्सर यावर महत्वाचे व्याख्यान करण्यात आले.या शिबिरात कोरोनाचे नियम पाळून गावातील ५० -६० महिलांनी शिबिरात सहभाग दर्शविला .

 

या शिबिरात महाराष्ट्र स्टेट चॅप्टर ए.एस.आय असोसिएशन ऑफ सर्जन्स अमरावती कॅन्सर रोगतज्ञ डॉक्टर इंगोले मॅडम व डॉक्टर गणोरीवाल या दोन्ही तज्ञांनी कॅन्सर रोग कसा ओळखावा व त्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्या त्या आजारांची संभाव्य लक्षणे याबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच या शिबिराला ग्रामपंचायत सरपंच श्री दिलीप जवंजाळ, उप सरपंच दिनेश डवले,

 

ग्रामपंचायत सदस्य श्री संजय खर्चान, समाजसेवक हरिभाऊ डवले, माजी सरपंच सौ शारदाताई बुध,अंगणवाडी सेविका ,आशाताई आदी गावातील मान्यवर उपस्थित होते.