
प्रतिनिधी -: धनराज खर्चान
पंचायत समिती भातकुली अंतर्गत जि.प.प्राथमिक मराठी शाळा,कोलटेक येथे स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची १३३ वी जयंती कोरोना नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती सर्वत्र ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरी केली जाते.Thank You Teacher या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी श्री.मारोतीभाऊ चेचरे (अध्यक्ष शाळा, व्यवस्थापन समिती) श्री.अजय घावट सर (मुख्याध्यापक),श्री.संतोषभाऊ दंदे सर (पं. स.धारणी),श्री.प्रल्हादराव कुटेमाटे, श्री.गोपाल तराळे,श्री.गजानन खोबरखेडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री.शैलेंद्र स.दहातोंडे यांनी केले.