अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अडगाव खाडे ग्रामपंचायत मध्ये धक्कादायक प्रकार ; ग्रामसेवक यांना ओढताड करून कार्यालयाचे लावले दार शासकीय कामात अडथडा करण्याचा गुन्हा दाखल

 

प्रतिनिधी :- धनराज खर्चान

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्राम अडगाव खाडे ग्रामपंचायत येथे कामगार नोंदणी प्रमाणपत्रावर थकीत कर भरणा केल्या शिवाय मी सही देऊ शकत नाही.

 

हे सांगणाऱ्या ग्रामसेवकास अपशब्दांत बोलचाल करून ओढाताड केली व कार्यालयाचे दार बंद केल्या प्रकरणी अंजनगाव पोलीस स्टेशन मध्ये शासकीय कामात अडचण निर्माण करण्याचा गुन्हा दोघांवर दाखल झाला असून पुढील कारवाही सुरु आहे.

 

पोलीस स्टेशन अंजनगाव येथीन प्राप्त माहिती नुसार विनोद प्रभाकर वाठोडकर ,वय ४५, ग्रामसेवक ग्रामपंचायत अडगाव खाडे हे आपल्या कर्तव्यावर असतांना सरपंच नीता विलास खाडे यांचे उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करत असतांना हरिदास किसन सरदार आणि आशिष अरुण सरदार दोन्ही रा. अडगाव खाडे हे ग्रामपंचायत कार्यालयात आले व त्यांनी कामगार नोंदणी प्रमाणपत्रावर ग्रामसेवक ह्यांची हस्ताक्षर मागितली मात्र त्यांचेवर घराची कर आकारणी थकबाकी असल्यामुळे आपण कर भरल्या शिवाय मी हस्ताक्षर करू शकत नाही.

 

असे म्हटले असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून धमकी युक्त स्वरात हुज्जतबाजी केली व ग्रामसेवक यांना लोटलाट केली तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा बंद केला. त्यावेळी सरपंच नीता विलास खाडे, शिपाई विनोद रंधे, राहुल कपले हे हजर होते.

 

त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना न जुमानता घडलेला प्रकार ग्रामसेवक यांचे जीवावर बेतनारा होता. अशी तक्रार ग्रामसेवक वाठोडकर यांनी अंजनगाव पोलीस स्टेशन मध्ये केली असून पोलिसांनी अप. क्र.६२८ /२०२१ अन्वये गुन्ह्याची

 

नोंद घेऊन भा.द.वी ३५३,३३२,१४२,१८६,५०६,३४ कलम अंतर्गत प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल पोळकर ह्यांचे मार्गदर्शनात उप.पोलीस निरीक्षक ढोले मॅडम ह्यांनी गुन्ह्याची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.